- Padmabhushan Rev. Vaidyaraj Shriramji Sharma
I am deeply accustomed to Revered Shri Sardeshmukh Maharaj and all his activities through Bharatiya Sanskriti Darshan Trust, though I was not the official part of the trust. He was a sincere follower of Indian culture and tradition With the vision to protect and propagate Indian culture, he founded Bharatiya Sanskriti Darshan Trust and started Ayurved College, hospital, research center. Today his vision is brought into a reality in an auspicious and scientific way by his son Dr. Sadanand Sardeshmukh. It is a matter of immense pride and pleasure for me. He has with him colleagues like Dr. Arvind Kulkarni. He has received blessing from late Shri Balasaheb Bharade who himself was a leader and a sincere follower of Indian culture.
We all know that cancer is considered as a dreadful disease not only in India but all over the world. Millions of people suffering from cancer end up with the disease each year. As far as I know, though Ayurved does not describe cancer by the same name, it is the first medical science that gives knowledge about cancer. About four thousand years ago in Sushrut Samhita cancer is described by its causes, symptomatology and treatment which are valid even today. Though modern medical sciences have made excellent progress, the fundamentals explained in Ayurved about the disease remain same. Sushrut has explained the disease as incurable and advised doctors to try to treat the disease meticulously. The treating doctor should explain the facts to the relatives of the patient though not to the patient himself, and should try to minimize the discomforting symptoms due to the disease. A lot of other facts are also explained about the disease. It is also explained that even if it is removed by operative procedure there will be recurrence, so to remove it from roots the doctor should do Agnikarma (Cautery). It seems from the explanation that Sushrut himself was a cancer specialist. He has also written about Arbuda, Adhyarbuda (Metastasis) which further clarifies the fact that there were Arbuda specialists at that time. They have not named the disease as Cancer, but explained it as Arbuda, also diseases like Shotha, Granthi, Vidradhi show similarity with cancer. In nutshell we can say that the disease is not new for disciples of Ayurved. We know that with influence of habitat, environment the presentation of disease changes from time to time.
It is also explained in Ayurved that there may not be a single name to a disease, in different geographical areas, at different times diseases have shown different symptoms and are given different names. What I mean to say is, though it is an age old disease and though Ayurved has explained its incurability, its time again for Ayurvedic doctors to concentrate on the same disease and do research work. Modern medicine has done excellent progress and lot of research work has been done, but no method is yet revealed to cure the disease. In this context, both the systems of medicine along with other systems should unite and do research work to limit the disease. Basic aim of Ayurved is “Swasthasya Swasthya Rakshanam, Aturasya Vyadhi Parimokshanam” to make a healthy person ever healthy and if a person gets any disease to cure the disease. So we should try and stop its progression in the society and to cure the disease, I know, Bharatiya Sanskriti Darshan Trust is working since last several years. The symptoms of apatient are reduced, longevity of age is seen. I urge them to work scientifically with modern sciences and control the progression of the disease.
Based on : Ashwasan III (Proceedings of IIIrd International Conference on Ayurved for Cancer)
- Dr. Vineeta Deshmukh
“१९८८ मध्ये बी. एम. एस ला प्रवेश घेतल्यावर पहिल्या वर्षापासूनच सरदेशमुख सरांचा प्राध्यापक म्हणून परिचय होता. तरीही १९९६ पर्यंत संस्थेच्या कॅन्सर संशोधन प्रकल्पाबद्दल मी अनभिज्ञ होते. १९९६ मध्ये योगायोगाने मी या प्रकल्पात काम करु लागले. तेव्हापर्यंत घरात अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या वेदना मी अनुभवल्या होत्या. मात्र डॉक्टर या नात्याने रुग्णाची तपासणी करण्याची वेळ येथेच सर्वप्रथम आली.
सुरवातीला आजाराच्या शेवटच्या अवस्थेत असलेले, आधुनिक वैद्यकाने चिकित्सेचा उपाय होणार नाही असे सांगितलेले रुग्ण प्रकल्पात अधिक येत असत. या रुग्णांत आयुर्वेदीक औषधांच्या मदतीने काही प्रमाणात उर्वरित आयुष्य सुसह्य होते असे आढळले. नंतर नंतर मात्र प्रकल्पात व्याधिनिदान झाल्या झाल्या आधुनिक चिकित्सेच्या जोडीला बरोबरी आयुर्वेदिक चिकित्सा घेण्यास उत्सुक असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आणि आमच्यापुढील पर्यायाने आयुर्वेदीक शास्त्रापुढील कॅन्सर- चिकित्सेचे आव्हान वाढले.
आयुर्वेद शास्त्रात कोणत्याही व्याधीची चिकित्सा ३ प्रकारे करण्यास सांगितली आहे.
१. शमन चिकित्सा :- शरीरातील वृध्द – व्याधी निर्माण करणार्या दोषांना साम्यावस्थेत आहे.
२. शोधन चिकित्सा :- वृध्द दोषांना वमन, विरेचन, बस्ति, रक्तमोक्षण व नस्य या पंचकर्माच्या सहाय्याने शरीराबाहेर काढणे.
३. रसायन चिकित्सा :- शरीर धातूंना बल देणारी व पर्यायाने व्यधिक्षमत्व वाढविणारी चिकित्सा, यापैकी सुरुवातीला बहुतांशी कॅन्सर रुग्णांत केवळ शमन चिकित्सा दिली जात होती. २-३ महिने शमन चिकित्सा घेतल्यानंतरच रुग्णांना हळूहळू आराम पडत असे. केवळ शमन चिकित्सेनेही कॅन्सर रुग्णांना काही प्रमाणात उपशय प्राप्त होतो असे लक्षात आल्यावर त्यातील काही रुग्णांना पंचकर्म/ शोधन चिकित्सा दिल्यास अधिक जलद बरे वाटले असे वाटू लागले व २००३ साली जे कॅन्सरग्रस्त रुग्ण पंचकर्म चिकित्सेस योग्य आहेत अशांना ही चिकित्सा द्यावी असे ठरविले. तत्पूर्वीही काही कॅन्सर रुग्णांत परमपूज्य सरदेशमुख महाराजांनी व वैद्य स. प्र. सरदेशमुख यांनी पंचकर्म चिकित्सा वाघोलीस दिली होती. या अनुभवाच्या व शास्त्रोक्त सूत्रांच्या आधारे कॅन्सरमध्ये पंचकर्म चिकित्सा वाघोली येथे सुरु झाली.
१९९५ मध्ये स्तनाच्या कॅन्सरचे निदान झाल्यावर शस्त्रकर्म व केमोथेरपीसह आयुर्वेदीक उपचारांसाठी वाघोली येथील रुग्णालयात आलेल्या रुग्णेला तेव्हा शमन चिकित्सेसह बस्ति चिकित्सा दिली होती. त्यानंतर २००३ पर्यंत रुग्णा केवळ तपासणीसाठी येत होती. स्तनाच्या कॅन्सरमध्ये वमन चिकित्सा उपयुक्त ठरते या सरदेशमुख सरांच्या अभ्यासानुसार मार्च २००३ मध्ये रुग्णेस आमच्या रुग्णालयात वमन दिले. त्यानंतर मधल्या काळात रुग्णेस अधुनमधुन जाणवणारा अपचनाचा त्रास कमी झाला. सध्या रुग्णा स्वस्थ असून रिपोर्ट ही नॉर्मल आहेत.
अशीच एक CA Rectum ची रुग्णा कोल्हापुरहून आमच्याकडे येत असे. १९९७ मध्ये प्रथम कॅन्सरचे निदान- त्यानंतर शस्त्रकर्म व केमोथेरपी झाली. २००२ मध्ये कॅन्सरने त्याच अवयवात पुन्हा डोके वर काढले. रुग्णेने पुन्हा शस्त्रकर्म व केमोथेरपी घेतली तरीही मलप्रवृती असमाधानकारक होणे, पोट जड वाटणे, भूक मंद असणे अशी लक्षणे रुग्णेत होतीच.
रुग्णा आयुर्वेदीय चिकित्सा घेण्यास वाघोली येथे आली. काही महिने शमन चिकित्सा घेण्यास सरदेशमुख सरांनी सांगितले. २१ दिवस रुग्णालयात प्रविष्ट होऊन बस्ति घेतले. पहिल्या २-३ बस्तिनंतर रुग्णेला मलप्रवृती समाधानकारक होऊ लागली, पोट हलके वाटू लागले व भूक लागू लागली. पूर्ण बस्तिचिकित्सेनंतर स्वत: रुग्णेलाही उत्साह वाटू लागला. विशेष म्हणजे बस्तिचिकित्सेपूर्वी रुग्णेस सोनोग्राफी मध्ये असलेले ओव्हेरियन सिस्ट बस्तिनंतरच्या सोनोग्राफीत नव्हते. अजूनही ही रुग्णा नियमितपणे औषध घेत आहे व स्वस्थ आहे.
CA Brain चे निदान झाल्यावर शस्त्रकर्म व रेडिओथेरपी घेऊन आयुर्वेदीक चिकित्सेसाठी आलेला २१ वर्षाचा तरुण मुलगा अजुनही फीट्स थांबल्या नाहीत म्हणून त्रस्त होता. शमन चिकित्सेने या रुग्णाचे फीट्सचे प्रमाण आणी तीव्रता कमी झाली होती. त्याला वाघोली येथील रुग्णालयात २ वेळा स्नेहन, स्वेदन, बस्ति, नस्य व शिरोबस्ति देण्यासाठी प्रविष्ट केले. या पंचकर्म चिकित्सेमुळे त्याचे फीट्सचे प्रमाण लक्षणीय कमी झाले व रुग्ण आत्मविश्वासाने इलेक्ट्रिशीयनचे काम रोज १०-१२ तास करु लागला.
पंचकर्म चिकित्सेने जादुसारखा परिणाम झालेला दुसरा एक CA Brain चा रुग्ण. १९९१ मध्ये वयाच्या ५ व्या वर्षी शस्त्रकर्म व रेडिएशन घेऊनही फीट्स चालूच होत्या. १९९५ पासून रुग्ण आयुर्वेदीय चिकित्सा घेऊ लागला. १९९७ मध्ये कॅन्सरचा पुनरुद्भव झाला. पुन्हा शस्त्रकर्म व रेडिएअशन घेतले. १९९९ मध्ये पुन्हा सीटी स्कॅन मध्ये अर्बुदाचा आकार थोडा वाढल्याचे आढळले. मुंबईतील प्रसिध्द न्युरॉलॉजीस्टने आता शस्त्रकर्म करु नका असा सल्ला दिला व रुग्णाचे ऍन्टीकन्व्हल्जनची औषधाची मात्रा वाढविली. या औषधामुळे रुग्ण दिवसेंदिवस आळशी होऊ लागला. सतत डोळ्यावर झापड असे, उच्चारही स्पष्ट नव्हते. पूर्वीचा उत्साही मुलगा आई- वडिलाच्या जबरदस्तीने दवाखान्यात येऊ लागला. आयुर्वेदातील बस्ति, नस्य, शिरोबस्ति या चिकित्सेने या रुग्णाला निश्चित फायदा होईल असे वाटल्याने १ वर्षापूर्वीच त्याला पंचकर्मासाठी रुग्णालयात प्रविष्ट होण्यास सांगितले होते. परंतु त्याच्या घरगुती अडचणीमुळे १ वर्ष तो प्रविष्ट होऊ शकला नाही.
शेवटी सप्टेबर २००४ मध्ये डॉ. कुलकर्णीनींही प्रविष्ट होण्याचा सल्ला दिल्याने तो वाघोली येथे पंचकर्मासाठी प्रविष्ट झाला. वय वर्षे १८, अधुनमधुन येणार्या फीट्स, यामुळे त्याचे वडीलही त्याच्यासह राहिले होते. ४ आठवडे पंचकर्म चिकित्सा देण्याचे ठरविले होते. ४ आठवडे चिकित्सेसाठी वाघोलीत रहायचे हे सुरुवातीला अवघड वाटत होते. परंतु ४-५ दिवसांच्या बस्ति, नस्य, शिरोबस्ति चिकित्सेने रुग्णाला उत्साह वाटू लागला सतत डोळ्यासमोर येणारी झापड निघून गेली. उच्चार सुधारु लागले व हस्ताक्षरही सुधारले. त्याच्या वडिलांच्याच शब्दात सांगायचे झाले तर अनेक वर्ष दारुड्यासारख्या अवस्थेत असलेला माझा मुलगा आता फ्रेश झाला. फीट्सची संख्या व वेगही कमी झाला. १ वर्ष पंचकर्म चिकित्सा घेण्याबाबत साशंक असलेला रुग्ण जाताना मात्र मी इथेच राहतो मला इथेच काही काम द्या अशी इच्छा व्यक्त करुन गेला.
मे १९९८ मध्ये स्किन कॅन्सरचे निदान झालेला एक जर्मनीतील रुग्णाने केवळ शस्त्रकर्मानंतर आयुर्वेदीय चिकित्सा घेतली. ३ वेळा वाघोलीला येऊन वमन व रक्तमोक्षण घेतले, औषधे व पथ्यपालनाच्या आधारे स्वत:चे नित्यव्यवहार नियमितपणे करीत आहे.
आजपर्यंत अशा २० रुग्णांना आम्ही पंचकर्म चिकित्सा दिली आहे. सर्वच रुग्णांमध्ये चांगला फरक जाणवला आहे. खंत एवढीच आहे की पंचकर्मासाठी कमीत कमी कालमर्यादा १४ दिवस असल्याने इतके दिवस रुग्णालयात प्रविष्ट होऊन पथ्यपालन- विश्रांती घेतली तरच ही चिकित्सा लाभदायी ठरत असल्याने अनेक रुग्ण प्रथम या चिकित्सेस नकार देतात. परंतु कॅन्सरच्या मरणप्राय वेदना टाळायच्या असतील तर पंचकर्म चिकित्सा हा एक आशादायी पर्याय आहे, मात्र तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने !
वैद्या विनीता देशमुख, एम्. डी. (आयुर्वेद) सहाय्य्क वैद्य, कॅन्सर संशोधन प्रकल्प
- Dr. Vasanti Godse
स्मृतींची उलटता पाने…..
“१९८४ साल, कॅन्सर या शब्दाचा खरा अर्थ व त्यामुळे उडणारा थरकाप अनुभवला तो या साली ! माझी अगदी जवळची व्यक्ती म्हणजे माझी आईच या रोगाने ग्रस्त होती. शौचावाटे होणारा रक्तस्त्राव, त्यामुळे मूळव्याधीचा आलेला संशय व त्याची कॅन्सरमध्ये झालेली परिणती या गोष्टी आमच्या कोणाच्याच लक्षात आल्या नाहीत.
अवघे ११ वर्षाचे माझे वय, कॅन्सरचे गांभीर्यही न कळता येण्यासारखे! शेवटी कॅन्सर या शब्दाचा अर्थ समजला तो बालभारतीतील डॉ पूर्णपात्रे यांच्या धड्याखालील कठीण शब्दार्थामध्ये ! कॅन्सर एक गंभीर आजार हा अर्थ समजताच हळूहळू घरातील अस्थिर व नैराश्यमय वातावरणामागील अर्थ उमजू लागला. दुर्दैवाने आईचा आतड्याचा कॅन्सर उशीरा लक्षात आल्याने चिकित्सेला हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. कॅन्सर निदानानंतर अल्पावधीतच तिची जीवनयात्रा संपली. मागे राहिल्या त्या केवळ आठवणी!
तेव्हापासून या आजारावर आपल्या क्षमतेनुसार काही काम करता येईल का? असा विचार मनात मूळ धरु लागला. या विचारामुळेच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मी आयुर्वेदाकडे वळले बी. ए. एस उत्तीर्ण झाल्यावर आमच्या सायन आयुर्वेद महाविद्यालयतील अध्यापिका वैद्या. मंगला नरवणे यांनी कॅन्सर संशोधन प्रकल्प प्रकल्पात काम करण्याविषयी विचारणा केली. तोपर्यंत भारतीय संस्कृति दर्शन ट्रस्टच्या कॅन्सर संशोधन प्रकल्पाविषयी मी पूर्णत: अनभिज्ञ होते. त्यांच्या या विचारणेमुळेच माझ्या मनात अनेक वर्षे दडलेल्या सुप्त इच्छेला मूर्तस्वरुप मिळाले.
एप्रिल १९९६ मध्ये मी या कॅन्सर संशोधन प्रकल्पात रुजू झाले. या संशोधन प्रकल्पामागील महाराजांची शास्त्रीय भूमिका, या प्रकल्पात काम करणार्या वैद्य. श्री. स. प्र. सरदेशमुख व डॉ. अरविंद कुलकर्णी यांचे प्रामाणिक प्रयत्न यामुळे प्रभावित झालेली मी या प्रकल्पाशी कधी एकरुप झाले हे माझे मलाच कळले नाही.
१९९६ ते २००४ या ८ वर्षाच्या कालखंडात अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांशी संपर्क आला. अनेक हृद्य अनुभवांना सामोरे जावे लागले. यापैकी दोन निवडक अनुभव या ठिकाणी नमूद करावेसे वाटतात.
१९९७ साल असावे! एक सुविद्य, सुसंस्कृत तरुण मुलगी आपल्या वडिलांसह आमच्या दादरच्या केंद्रात आलेली. वडील एका बँकेत उच्चपदस्थ अधिकारी, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेली, भविष्याची अनेक स्वप्ने उराशी बाळगलेली ही संवेदनशील मुलगी ! जीभेच्या कॅन्सरने ग्रस्त या मुलीने आधुनिक वैद्यकाची शस्त्रकर्म, रेडियेशन व केमोथेरपी ही सर्व चिकित्सा घेतलेली.
परंतु दुर्दैवाने चिकित्सेला म्हणावा असा प्रतिसाद न्हवता. एवढे असुनही त्या मुलीच्या डोळ्यात तरळत होता तो दुर्दम्य आशावाद! त्या मुलीची केस हिस्ट्री घेताना या आजारामागील हेतूंचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ३ महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. त्या ३ गोष्टी म्हणजे- खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, रोज सकाळी ब्रश करताना जीभ जोरात घासण्याची सवय व उच्च शिक्षणामुळे हॉस्टेलला रहावे लागल्यामुळे घरापासून दूरावल्याचे दु:ख काही दिवस आयुर्वेदिक चिकित्सा घेतल्यानंतर तिने चिकित्सा खंडित केली. काही वर्षांनी वर्तमानपत्रातील ‘श्रध्दांजली’ या सदरात त्या मुलीचा फोटो पाहिल्यानंतर मनात वाईट वाटले. ती मुलगी काळाच्या पडद्याआड गेली. मात्र तिच्या डोळ्यातील तो दुर्दम्य आशावाद माझ्याप्रमाणे सावलीसारखा उभा राहतो.
दुसरा एक सांगण्यासारखा प्रसंग म्हणजे ८८ वर्षाच्या आजोबांचा. मोतिबिंदूच्या ऑपरेशनसाठी ऍडमिट झालेल्या आजोबांचे आमाशयाच्या कर्करोगाचे अपघातानेच निदान झालेले. डाव्या कुशीत वेदना, सतत उलटीची संवेदना, भूक मंदावलेली ही लक्षणे घेऊन आजोबा उपचारासाठी आले, तेच मुळी रुग्णवाहिकेतून ! बिछान्याला खिळून असलेल्या या आजोबांची नाडी व पोट तपासल्यावर सरदेशमुख सरांनी औषधांचा मारा न करता आहारातून हळूहळू पचनशक्ती सुधारावी असा निर्णय घेतला. त्यासाठी सरांनी त्यांच्या नातेवाईकांना सकाळ-संध्या २-२ चमचे आले- लिंबूरस मधातून देण्यास सांगितला व यकृताचे कार्य सुधारण्यासाठी दुपारी – रात्री २-२ चमचे कोरफडीचा रस, हळद व मध यांच्या मिश्रणातून देण्यास सांगितला. बिछान्याला शिळून बसलेले आजोबा १५ दिवसात आपणहून उठण्याचा प्रयत्न करु लागले. १ महिन्यानंतर आजोबा स्वत:च्या पायाने दवाखान्यात आले. हळूहळू प्रकृतीत उतार पडू लागला. शेवटी काही महिन्यांनी आजोबांचे निधन झाले. पण ते हृद्रोगाने, नव्हे कर्करोगाने.
या प्रकल्पातील माझा ८ वर्षाचा कालावधी मला खूप काही शिकवून जाणारा! सौ. रेखाताई कुलकर्णी, श्री. मंदार केळकर, सौ. शुभदा आंबेकर असे अनेक रुग्ण ज्यांची कर्करोगाशी लढण्याची ताकद आम्हा चिकित्सकांसाठी टॉनिकच असते. ही ताकदच आम्हाला आयुर्वेदिक चिकित्सकांना अधिकाधिक संशोधन करण्याची उमेद देऊन जाते. या सर्व रुग्णांची आमच्याविषयीची आपुलकी शब्दात सांगता न येण्यासारखी !
या प्रकल्पात काम करताना ८ वर्षे कशी उलटली हे माझेच मला कळले नाही. काही रुग्णांमध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही, तर काही रुग्णांना आम्ही या प्रकल्पाद्वारे चांगली मदत करु शकलो याचे आत्मिक समाधान आहे.
‘सर्वेऽ पि सुखिन : सन्तु सर्वे सन्तु निरामया : ।’
अशी धन्वतरी चरणी प्रार्थना करुन कॅन्सरला सर करण्याच्या आमच्या प्रयत्नांना यश मिळो अशी आशा व्यक्त करते.
कॅन्सर संशोधन प्रकल्प- मुंबई केंद्र
- Dr. Vidya Hirlekar
दिव्यत्वाची जेथे प्रचिती….
“परमपूज्य सरदेशमुख महाराजांच्या भेटीचा योग १९८५ मध्ये आला. त्यांच्या अतिशय साध्या पण प्रेमळ व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्यांच्या सानिध्यातील व्यक्तींवर खूप आहे हे जाणवले. त्यांचा मायाळू स्वर- आपुलकीने ‘बाळ’ अशी हाक मारणे कायम लक्षात राहिले. नंतर काही निमित्ताने त्यांच्या भेटीचा सुयोग येत राहिला. विविध शास्त्रीय, वैचारिक, अध्यात्मिक विषयांवरील त्यांचे प्रभुत्व चर्चेतून प्रकर्षाने जाणवत राहीले. त्यांच्या या प्रगल्भ, ज्ञानपूर्ण व्यक्तिमत्वाने संबंधित अतिशय भारुन जात.
वाघोलीची आपुलकी व तेथील विविध प्रकल्पांविषयींची त्यांची दूरदृष्टी किती तीव्र होती याचा प्रत्यय आज येतो, त्यावेळी खरेच अचंबित व्हायला होते. १९८५ मध्ये या जागेस भेट देण्याचा योग आला होता. महाराजांनीच आग्रहपूर्वक जागा बघून यायला पाठविले होते. त्यावेळीचे विस्तीर्ण, उजाड माळरान पाहून काही वर्षांनी येथे एक विकसित संस्था उभी राहणार आहे यावर कोणाचाही विश्वास बसणे खरंच कठीण होते. आज येथे संस्थेचे आयुर्वेद महाविद्यालय, आयुर्वेद रुग्णालय व ‘अथर्व आयुर्वेद फार्मास्युटिकल्स्, पंचकर्म केंद्र, आध्यात्मिक केंद्र, संजीवनी कृषी विभाग, गोशाळा प्रकल्प आदी विभाग विकसित झाले आहेत.
१९८५ मध्येच महाराजांनी संस्थेचे आयुर्वेदीक औषधी निर्माण केंद्र असावे व त्या प्रकल्पात श्री. व सौ. हिर्लेकरांनी मदत करावी असा शब्द आम्हा उभयतांकडून घेतला. त्यानंतर १७-१८ वर्षांनी डॉ. सरदेशमुख सरांनी त्या वचनाची आठवण ठेऊन आम्हास मदतीस घेऊन ‘अथर्व आयुर्वेद फार्मास्युटिकल्सची’ स्थापना केली. T- Schedule अंतर्गत G. M. P. Norms नुसार उत्पादन करणारी अशी ही फार्मासी महाराजांच्या निकषानुसार औषधाची गुणवत्ता श्रेष्ठ राखीत आहे.
डॉ. स. प्र. सरदेशमुख सरांनी महाराजांच्या संस्थेविषयीच्या आदर्श कल्पनांना अथक परिश्रमाने मूर्त स्वरुप दिलेले आहे. महाराजांचे त्यांच्या व संस्थेच्या पाठीशी आहेतच हे जाणवते. एका सुपुत्राने आपल्या महान पित्याला गुरुस्थानी मानून त्याच्या दूरदृष्टीला दिलेली ही गुरुदक्षिणा व मानवंदनाच होय !
- Dr. Smita Kolte
एक स्मरण !
“परमपूज्य कै. प्रभाकार केशव सरदेशमुख महाराज यांचा व आम्हा उभयतांचा परिचय अनेक वर्षांपासून होता. महाराजांना आपल्यातून जाऊन बरीच वर्षे झाली तरीही त्यांचे अस्तित्व सभोवती आजही जाणवते. वाघोलीच्या आमच्या सुरुवातीच्या लहानश्या दवाखान्यात त्यांचे नेहमी येणे जाणे असे.
साधी रहाणी व वैज्ञानिक विचारसरणी माझ्या मनाला नेहमीच भुरळ पाडत असे. काळाच्या पुढे असणारी त्यांची विचारसरणी व आज दिसणारी कॉम्प्युटर विज्ञानाची प्रगती २० वर्षांपूर्वीच त्यांच्या बोलण्यात असे. त्यावेळी त्यांच्या बोलण्यात वाटणारी अतिशयोक्ती आज प्रत्यक्षात साकार झालेली पाहून खरंच त्यांच्या ज्ञानाची व दूरदृष्टीची कमाल वाटते. अर्थात सिध्द पुरुषांना काही अशक्य नाही हे तितकेच खरे !
महाराजांचे समाधिरुपातील सदेह अस्तित्व आजही आपल्याला प्रेरणादायी आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन !