- Ben Hatai
I had visited the Gujarat Ayurveda University in Jamnagar 2001, Jan for the signing ceremony of Globalization of Ayurveda education proposed by Dr. Kurup a vice chancellor. Afterwards, I had visited Wagholi Ayurveda College with Ms. Sato Makiko.
When I saw College building, Samadhi, Clinic, 5 Panchakarma treatment bungalows in huge holy land with gently hill, I realized Dr. Sardeshmukh’s dream has come true. I got a chance to see a clinical doctor from Mumbai University, examining liver cancer patient. They have been x-ray photo and discussed with aropatic doctor. That is my first time to know how Ayurveda challenging to cancer.
Japan Ayurveda academic society and Institute of traditional Oriental medicine started 1st International Symposium on next year 2002. We had invited Dr. Sardeshmukh as a lecturer about asthama and cancer. I could felt how Ayurveda have various and deep aspect on cancer. I also add here that Dr. Sardeshmukh often comes to Japan to examine patients and gives very kind guidance about food. So many patients are always waiting for him.
I wish this Cancer Decade Program will get success from bottom of my heart.
Based on :Cancer Research Project (Decade Souvenir)
- K. B. Grant
As you know cancer is increasing by leaps and bounds so as any other vascular condition also, like heart problems, Diabetes, blood pressure and now a day trauma but cancer is one of the wicked and deadly diseases.
I believe that cancer can be cured, I believe if we work hard and we have got everything here to work hard with, cancer can be cured. I fully agree with Padmabhushan Pandit Shriramjee Sharma, that Ayurved can cure cancer; you have got to remember one thing that no matter, how many technical details we go through; it is all borrowed from the west. We do not make any out standing discoveries on our own and I do not see why. We have got all the ingredients to do so. We have got a lovely set of good, intelligent people, good climate, everything under the sun. And yet we have to borrow the things from the west which I don’t think we should do now. India is progressing in a very rapid manner but true discoveries, world renowned discoveries we have not yet made. And this is a chance for the Ayurved to come in to play. Many diseases in the past have been over come like small pox, leprosy, tuberculosis, syphilis, so why not cancer. But for that we got to have confidence in ourselves, we have to work very hard and see that this cult is wiped out of our country.
Please believe me anything in the world can be achieved. I do not want to praise my self but I started in a very small way without any money in my pocket with the help of the God and you people, we have built institution like Ruby Hall in Pune, Nursing College and now we have build a very beautiful Cancer Center. Every one of us has got same potential to do it, why don’t we exert ourselves and say from this very moment that we will do all in our might, take all the help from Ayurvedic medicine and try to knock out this cult from the earth.
On our part we have set up an institution. It is equipped with latest technologies like – IGRT – Image Modulation Radiation Therapy. It pinpoints the tumor, unlike other radiations where the rays can be scattered. With this radiation, only one in Asia so far we have not only treated cancer in the body but even inside the skull. We have radiated about 50 people without opening the skull and that’s the great advantage.
I would be happy today or tomorrow if one of us discovers the ‘cure’ for cancer from the Ayurvedic medicine. This will make me the happiest person in the world.
- Arvind Kulkarni
११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवादाने अमेरिकेवर अभूतपूर्व असा हल्ला केला. दहशतवाद्यांनी दिवसाढवळ्या देशाच्या दरारा निर्माण करणार्या संरक्षण व्यवस्थेला चकवले आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या जागतिक व्यापार केंद्राचा विध्वंस केला. मग जगातील सर्वशक्तिमान म्हणावी अशा अमेरिकेने धूर आणि धुळींचे लोळ विरण्याच्या आत दहशतवादाविरुध्द दंड थोपटले.
दहशतवाद गेली अनेक वर्षे आपली पाळेमुळे पसरतो आहे. सुरवातीच्या काळात ती एक किरकोळ विषवल्ली आहे असे समजून जगाने काहीसे दुर्लक्ष केले. मात्र काही काळातच अवास्तव भौतिक महत्त्वाकांक्षी या वणव्यात तेल ओतण्याचे काम सुरु केले. तरीही या भस्मासुराने आपले हात फैलावून जागतिक शांतता व स्थैर्य यांनाच आव्हान देण्याची वेळ येईपर्यंत जगाला जाग आली नाही.
मानवजातीला ज्याची दहशत वाटते त्या कर्करोग या आजाराचे देखील उगम आणि परिणाम यांच्या बाबतीत वर उल्लेखलेल्या दहशतवादाशी मोठेच साधर्म्य आहे. प्राचीन हिंदु वाङ्अमय म्हणून ओळखले जाणारे वेद ‘पिंडी वसे ते ब्रह्मांडी असे’ अशा शब्दात मानवी शरीराचे वर्णन करतात. प्रादेशिक शांततेकडे झालेले दुर्लक्ष जसे सगळ्या जगाला धोक्याच्या उंबरठ्यावर आणून उभे करते तद्वतच ‘दोष’ म्हणजेच शरीराच्या कुठल्याही भागात निर्माण झालेले व दीर्घकाळ रेंगाळणारे/ टिकून राहिलेले प्रकृति अस्वास्थ घातक असते. वर्षानुवर्षे दबून राहिलेल्या समस्येचे प्रकटीकरण म्हणावे असे हे कॅन्सरचे रुप वैद्यकशास्त्राला कोड्यात पाडणारे आहेत.
मानवी शरीर हे हजारो अब्ज पेशींचे निवासस्थान आहे. ज्ञात आणि आज्ञात, जन्मजात आणि बाह्य जगाकडून स्वीकृत अशा अनेक गोष्टींचा त्यांच्या वर्तनावर प्रभाव पडलेला दिसतो. जीवनशैली, आहाराच्या सवयी, मनाची ठेवण, शरीराची जडणघडण, क्रोमोसोमची मांडणी इ. काहींचा कर्करोगाच्या उद्भवतात थेट संबंध दिसून येतो. मात्र आरोग्यविघातक सवयी उचलण्यच्या वयापर्यंत न पोचलेले मूल कर्करोगाच्या विळख्यात सापडते तेव्हा कर्करोगाची कारणपरंपरा शोधणारे तर्कशास्त्रही थिटे पडते. हिंदु तत्वज्ञानाच्या आणि पुनर्जन्माच्या संकल्पनेच्या आधारे विचार केला तर हे आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे फळ आहे काय? ते कर्मच आपल्या क्रोमोसोमवाटे आपले भवितव्य घडवत आहे का? असे मती कुंठित करणारे प्रश्न आपल्याला पडतात.
अतिरेक्यांचा अड्डा करणे एकवेळ सोपे पण तो उध्वस्त करताना आसपासच्या जनजीवनाचे व घरादारांचे होणारे नुकसान थोपावणे तितकेसे सोपे नाही. आणि याहीपुढे जाऊन पहायचे तर हल्ला हा अगदी तात्पुरता प्रतिबंधक उपाय ठरतो. दहशदवादाला जन्म देणारे आणि खतपाणी घालणारे वातावरण जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत दहशतवाद फोफावतच राहील. आधुनिक औषधी शास्त्रातही अशाच त्रुटी आढळतात. आधुनिक वैद्यकाच्या यादीत कर्करोग संपूर्णपणे बरा करणारा उपचार आजमितीला अस्तित्वात नाही. किरणोपचार आणि औषधोपचारांचा शास्त्रसंमत वापरही शरीराच्या वाईट पेशींवरही हल्ला करतो. ज्यामुळे रोग बळावतो त्या मूळ कारणांचा नायनाट करण्यातही आधुनिक वैद्यकशास्त्र कमी पडते. असे सुक्याबरोबर ओलेही जाळणारे उपचार शरीर कमकुवत करतात. आणि ह्याचबरोबर प्रकृतीत इतर गंभीर घडामोडींची शक्यता निर्माण होते.
आधुनिक वैद्यकाने काही मोजता येण्याजोगे ठरवलेले मापदंड, तसेच रक्ततपासण्या, क्ष किरण तपासण्या, स्कॅन्स आणि या तपासण्यांचे अहवाल अशा अनेक गोष्टी ऍलोपॅथीच्या उपचारांचा आधारभूत असतात. या औषधोपचारांनी रुग्णाला झट की पट आराम देण्याची शक्यता मोठी असते मात्र या सार्या घटनाक्रमात वैद्यकीय चिकित्सकाच्या नजरेतून काही सुप्त घटक निसटतात. पहिली महत्वाची बाब म्हणजे ताप, जुलाब, मळमळ, वेदना, इत्यादि लक्षणे रोगच असतील असे नाही. ते सारे नैसर्गिकरित्या बरे होणार्या प्रक्रियेचे निदर्शकही असू शकते. दुसरे म्हणजे मानवी शरीरात दुरुस्त होण्याची, स्वत:चे गमावलेले प्रकृतिस्वास्थ्य पुन्हा प्राप्त करुन घेण्याची एक नैसर्गिक क्षमता आपल्यात असते. वर उल्लेखलेल्या लक्षणांचा उपशम होण्यासाठी घाईघाईने औषधओपचार करण्याने या नैसर्गिक रित्या बरे होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. ह्यामुळे रोग जुनाट होण्याची दाट शक्यता संभवते आणि शेवटची आणि तरीही महत्वाची गोष्ट म्हणजे मन आणि आत्मा यांचा औषधोपचार पध्दतीतला मोलाचा वाटा. त्याकडे दुर्लक्ष करणे अक्षम्य चूक ठरेल. मात्र या उणीवा वगळल्या तर ऍलोपॅथीच्या औषधोपचारांमुळे शस्त्रक्रिया आणि अत्यावश्यक पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे ऍलोपॅथीचे औषधोपचार आणीबाणीच्या वेळी उपयोगी पडणारे एकमेव उपलब्ध हत्यार ठरतात. मात्र हे अढळस्थान मिळूनही समाजाच्या आरोग्याचा सातत्याने ढासळत चाललेला आलेख ऍलोपॅथीच्या मर्यादा स्पष्ट करतो. आधुनिक वैद्यकातला वाढता क्लिष्टपणा, त्याचा आजारांविषयीचा यांत्रिक रोख आणि सर्वसामान्यांना न परवडणार्या सार्या किंमती ही यामागील प्रमुख कारणे असावी.
या पार्श्वभूमीवर आपण वैद्यकाचा प्रसार आणि स्वीकार डोळ्यांखालून घातला पाहिजे. ‘पर्यायी वैद्यक’ (Alternative Medicine) म्हणून ओळखले जाणारे औषधोपचार हे काही एक निश्चित चौकटीत बंदिस्त असलेले शास्त्र नाही. पर्यायी वैद्यक म्हणजे जगभर प्रचलित असलेल्या, जगभर विखुरलेल्या आणि पुरातन काळापासून चालत असलेल्या व्याधिमुक्तीच्या कसोटीला उतरलेल्या उपचारांचा समुच्चय. योग्य त्या उपचारांना सुरुवात करण्यापूर्वी रोगाचे मूळ कारण शोधून काढणे आणि शरीर -मनाचा अन्योन्यसंबंध ध्यानात घेऊन आणि त्याचा समन्वय एकत्रितपणे करुन उपचार करणे ही पर्यायी वैद्यकामागील प्रमुख कल्पना आहे ह्या विचारपध्दतीमुळे नैसर्गिक, निर्धोक आणि सुलभ पध्दतींनी बरे करणारे मार्ग खुले होतात.
अनेक दीर्घकालीन आजार मानवनिर्मित आहेत. पर्यायी उपचार पध्दती असे सूक्ष्मपणे रोगाला आमंत्रण देणारे घटक विचारात घेते. नैसर्गिक अन्न, व्यायाम, ध्यनधारणा, योग, सकारात्मक मन:प्रवृती तसेच उत्तम निद्रा या सार्या आरोग्यदायी सवयींचा पर्यायी उपचार पध्दती पुरस्कार करते. असे रोगप्रतिकारक शक्ती वृध्दिंगत होत असलेले शरीर रोगाशी उत्तम लढत देऊ शकते आणि आजाराचे उच्चाटन करु शकते.
अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ (NIH) ची वॉशिंग्टन डी. सी. येथे असलेली शाखा पर्यायी व प्रोत्साही औषधोपचारी राष्ट्रीय केंद्र म्हणून ओळखली जाते. (NIH) चीच नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ही अन्य एक शाखा प्रस्थापित ऍलोपॅथी औषधांच्या जोडीने पर्यायी औषधोपचारांवरील संशोधनाला प्रोत्साहन देते. अमेरिकन मेडिकल असोशिएशनने १९९८ मध्ये प्रकाशित केलेल्या नियतकालिकात डॉ. आयसेनबर्ग यांचा एक लेख प्रसिध्द झाला आहे. त्यात दरवर्षी एकूण अमेरिकन लोकसंख्येच्या सुमारे ४० टक्के लोक विविध आरोग्यसमस्यांसाठी पर्यायी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेत असतात असा उल्लेख आहे.
पर्यायी उपचारपध्दतींच्या अनेक प्रवाहातील एक असलेली आयुर्वेद ही आरोग्य विश्वात भारताने टाकलेली मोलाची भर समजली जाते. गेल्या काही वर्षात आयुर्वेदाकडे सार्या जगाचे लक्ष वेधलेले दिसते. संशोधन आणि विकास तसेच ज्ञानाचे व्यवस्थापन या गोष्टींमधले अत्याधुनिक तंत्रज्ञान वेळीच अमलात आणले तर आयुर्वेदाला, आधुनिक वैद्यकाला पूरक ठरणार्या पर्यायी औषधोपचारात मानाचे स्थान प्राप्त होईल.